भाजप आमदार वगळता पाचही आमदार सुरक्षित

भाजप आमदार वगळता पाचही आमदार सुरक्षित

भाजप आमदार वगळता पाचही आमदार सुरक्षित
विजयी- अनिल देसाई शिवसेना (उबाठा ) - ३९५१३८
पराभूत- राहुल शेवाळे, शिवसेना (शिंदे गट ) - ३४१७५४
मुंबई, ता. ६ ः दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी अणुशक्ती नगर, शीव कोळीवाडा, चेंबूर, धारावी या चार, तर शिवसेना (शिंदे) गटाच्या राहुल शेवाळे यांना केवळ माहीम, वडाळा या दोनच विधानसभा मतदारसंघातून लीड मिळवता आली आहे. देसाई यांनी वर्षा गायकवाड यांच्या धारावी आणि अणुशक्ती नगर मतदारसंघातून मिळवलेल्या निर्णायक आघाडीमुळे राहुल शेवाळे यांची हॅट्‌ट्रिक रोखली. मतदारसंघनिहाय मते बघता भाजपची शीव कोळीवाड्याची जागा धोक्यात आली आहे.

या आमदारांना धोक्याची घंटा

मतदारसंघ- शीव कोळीवाडा
आमदार-कॅप्टन तामिळ सेल्वन, भाजप
या मतदारसंघात अनिल देसाई यांनी ९,३१२ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या तामिळ सेल्वन यांच्यापुढे आगामी विधानसभा निवडणुकीत ही पिछेहाट भरून काढण्याचे आव्हान आहे.
एकूण मतदान -१३२८०३
अनिल देसाई - ७०९३१
राहुल शेवाळे-६१६१९
....
मतदारसंघ-चेंबूर
आमदार- प्रकाश फातर्पेकर, शिवसेना (उबाठा)
या मतदारसंघातून शिवसेना उबाठाच्या आमदारांनी २,८७८ एवढी मामुली मतांची आघाडी अनिल देसाई यांना मिळवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ही आघाडी वाढवण्याचे खडतर आव्हान फातर्पेकर यांच्यावर आहे.
एकूण मतदान- १३६४०९
अनिल देसाई- ६१३५५
राहुल शेवाळे- ५८४७७
...
यांनी राखला किल्ला

मतदारसंघ- धारावी
आमदार- वर्षा गायकवाड, काँग्रेस
वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, मात्र त्यांनी धारावीमधून अनिल देसाई यांना सर्वाधिक म्हणजे ३६,८५७ मतांची आघाडी दिली आहे.
एकूण मतदान-१,२२,८६८
अनिल देसाई- ७६,६७७
राहुल शेवाळे- ३९,८२०
...
मतदारसंघ- वडाळा
आमदार- कालिदास कोळंबकर, भाजप
या मतदारसंघातून १०, ६२६ मतांची आघाडी राहुल शेवाळे यांना मिळवून दिली आहे.
एकूण मतदान-१,१५,५११
अनिल देसाई- ४९,११४
राहुल शेवाळे- ५९,७४०
.....
मतदारसंघ- माहीम
आमदार- सदा सरवणकर, शिवसेना (उबाठा)
या मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना १,३९,९० मतांची आघाडी दिली आहे. ही राहुल शेवाळे यांनी मिळवलेली सर्वाधिक आघाडी आहे.
एकूण मतदान- १,२९,४४७
अनिल देसाई- ५५,४९८
राहुल शेवाळे-६९,४८८
....
मतदारसंघ- अणुशक्ती नगर
आमदार- नवाब मलिक, तटस्थ
नवाब मलिक यांनी जामिनावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. मुस्लिमबहुल मतदारसंघातून देसाई यांनी धारावीपाठोपाठ सर्वाधिक म्हणजे २९०८३ मतांची आघाडी घेतली आहे.
एकूण मतदान- १,२९,४४७
अनिल देसाई- ७९,७६७
राहुल शेवाळे- ५०,६८४
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com