भिवंडीत केमिकल गोदामांस आग

भिवंडीत केमिकल गोदामांस आग

भिवंडीत केमिकल गोदामांना आग

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील दापोडा रोडवरील वळपाडा येथील रितेश कम्पाऊंडमधील केमिकलच्या गोदामांना आज सायंकाळी आग लागून त्यामध्ये दोन गोदामे जळून खाक झाली. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.
गोदामातील कामगार कामावरून जाण्याच्या वेळीच केमिकलच्या गोदामांस अचानक आग लागली. काही वेळातच ही आग पसरून त्यामधील केमिकल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग जसजशी पसरत होती, त्याप्रमाणे गोदामातील स्फोटक केमिकलच्या ड्रमना आगीची धग लागून त्यांचा स्फोट होऊन ते हवेत उडत होते. आगीची खबर मिळताच भिवंडी पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोचले. त्यांनी आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. दोन गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com