शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी व महसूल कार्यशाळा

शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी व महसूल कार्यशाळा

शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी व महसूल कार्यशाळा

बेलापूर, ता. ७ : आजही बऱ्याच लोकांना शेतजमीनविषयक फारशी माहिती नाही किंवा ती माहिती सोप्या भाषेत उपलब्ध नाही, असे आपण म्हणू शकतो. विशेषतः जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या बहुतांश प्रॉपर्टी एजंटना देखील कागदपत्राचे फारसे ज्ञान नाही. छोट्या-छोट्या कागदपत्रांच्या कामाकरिता प्रत्येकवेळी मध्यस्थांना पैसे मोजावे लागतात. माहिती अभावी पैसे तर उकळले जातातच, पण फसवणूक देखील होते. निर्णय चुकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सोप्या भाषेत उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न आहे. या कार्यशाळेत आपण ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमूना इ. शेतजमीनविषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा याबद्दल चर्चा करणार आहोत. तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाईन कसे मिळवायचे आणि विविध ऑनलाईन उपलब्ध साधने कशी वापरावी याबद्दल मार्गदर्शन होईल. मूलभूत ज्ञान तुम्हाला लाखोंच्या तोट्यापासून वाचवू शकते! जमिनीच्या फसव्या व्यवहारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी उपयुक्त कार्यशाळा. तुम्ही जमीन मालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट असाल, तर नक्की सहभाग घ्या.

कार्यशाळा ३० जून रोजी स. १०:३० ते सायं. ०४:३० यावेळेत आयोजित केली आहे. रियल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड कार्यशाळेला मार्गदर्शन करतील. चहा-पाणी, जेवण आणि पार्किंगची सोय आयोजकांनी केली आहे. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी पुढील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. मर्यादित ७५ जागा.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७.
ठिकाण: ‘सकाळ भवन’, सीबीडी बेलापूर, प्लॉट क्र. ४२ बी, सेक्टर ११, नवी मुंबई.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com