धारावीतील रहिवाशांची पात्रता निश्चिती सुरू होणार

धारावीतील रहिवाशांची पात्रता निश्चिती सुरू होणार

धारावीतील रहिवाशांची पात्रता निश्चिती सुरू होणार


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आंबेडकर नगर आणि शताब्दी नगरातील जवळपास ४७० झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीचा कार्यक्रम पुढील तीन-चार दिवसांत सुरू होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पात येणाऱ्या झोपड्यांचे सर्वेक्षण करत म्हाडाने गेल्या दोन वर्षांपासून रहिवाशांकडून कागदपत्र जमाजमव केली आहे. त्याच आधारे आता पहिल्या टप्प्यात झोपडीधारकांची पात्रता निश्चिती केली जाणार आहे.
धारावीत सुमारे एक लाखाहून अधिक झोपड्या असून त्यांचा पुनर्विकास धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ‘डीआरपीपीएल’कडून केला जाणार आहे. त्याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू असून पहिल्या टप्प्यात नंबरिंग आणि बायोमेट्रिक सर्व्हे केला जात आहे. दरम्यान, धारावीचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे. त्यामुळे म्हाडाने २०१६ मध्ये आंबेडकर नगर आणि शताब्दी नगरातील ज्या झोपड्यांचा सर्व्हे करून कागदपत्र जमा केली आहेत. त्याच आधारे येथील रहिवाशांची पात्रता निश्चित केली जाणार असल्याची माहिती डीआरपीपीएलच्या एका अधिकाऱ्याने दिली, मात्र सध्याच्या पुनर्विकास प्रकल्पात पात्र रहिवाशांबरोबरच अपात्र ठारणाऱ्यांनाही घर मिळणार आहे. धारावी तब्बल सहाशे एकर विस्तीर्ण भूखंडावर वसलेली आहे. संपूर्ण धारावीचा एकाचवेळी पुनर्विकास करणे शक्य नाही. त्यामुळे आधी झोपड्यांना नंबरिगं, बायोमेट्रिक सर्व्हे आणि त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे झोपडीधारकांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कामे सुरू असून डीआरपीपीएलने सर्व्हे केलेल्या कमला रमन नगर, नाईक नगरातील रहिवाशांची पात्रता निश्चिती पुढील महिनाभरात होऊ शकणार असल्याची माहिती डीआरपीपीएलच्या एका अधिकाऱ्याने यावेळी दिली.
..
अडीच लाख रुपयांत घर
धारावीत २००० सालच्या आधीची झोपडी असलेल्या झोपडीधारकाला धारावीतच ३५० चौरस फुटाचे मोफत घर मिळणार आहे. २००० नंतरच्या आणि २०११ सालच्या आधीच्या झोपडीधारकाला अडीच लाख रुपयांत धारावीतच घर मिळेल, तर २०११ नंतरच्या झोपडीधारकाला भाड्याने घर मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com