म्हाडा मुख्यालयात तीन तास बत्ती गुल

म्हाडा मुख्यालयात तीन तास बत्ती गुल

म्हाडा मुख्यालयातील बत्ती गुल
अनेकजण लिफ्टमध्ये अडकल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : म्हाडा मुख्यालयाचा वीजपुरवठा तब्बल तीन तास खंडित झाल्याने याठिकाणी लिफ्टमध्ये १० ते १२ जण अडकल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यातच मुख्य सर्व्हर बंद झाल्याने कामकाज पुरते ठप्प झाले होते. त्यामुळे घामाघुम झालेल्या अनेकांनी वरिष्ठांच्या परवानगीने कार्यालयातून काढता पाय घेतला.
म्हाडाचे मुख्यालय असलेल्या गृहनिर्माण भवनाला अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून वीजपुरवठा केला जातो. दुपारी साडेतीनच्या सुमारास अदानीच्या मिनी पिलरमध्ये बिघाड झाल्याने अर्ध्याहून अधिक कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक वीज खंडित झाल्याने सामान्य अभ्यागतांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये पहिल्या मजल्यावर १० ते १२ जण १५ मिनिटांसाठी अडकले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत आपत्कालीन चावीच्या मदतीने लिफ्ट उघडून या सर्वांना बाहेर काढले. त्यातच ऐन दुपारीच वीज गेल्याने कार्यालयात अंधार पडल्याने अभ्यागतांबरोबरच कर्मचारीही इमारतीखाली उतरले. तब्बल तीन तासांच्या खोळंब्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. याबाबत म्हाडाकडे विचारणा केली असता अदानीच्या म्हाडाला वीज पुरवणाऱ्या मिनी पिलरमध्ये बिघाड झाल्याने हा वीजपुरवठा खंडित झाल्याचे म्हाडाच्या विद्यूत विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश देशमुख यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com