मेट्रो वनने दिला ९७ कोटी मुंबईकरांचा गारेगार प्रवास

मेट्रो वनने दिला ९७ कोटी मुंबईकरांचा गारेगार प्रवास

मेट्रो वनने ९७ कोटी मुंबईकरांचा गारेगार प्रवास
गेल्या दहा वर्षांचा आलेख चढता; ११ लाख फेऱ्या, ९९ टक्के वक्तशीरपणा


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईतील पहिली मेट्रो अशी आळेख असलेल्या घाटकोपर-वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रो-वनने गेल्या दहा वर्षात ११ लाख फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल ९७ कोटी प्रवाशांनी गारेगार प्रवास केला आहे. तसेच ही मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून त्यांच्या गाड्यांचा वक्तशीरपणा म्हणजे वेळेवर धावण्याचे प्रमाण ९९ टक्के एवढे जास्त आहे.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि राज्य सरकारने संयुक्तपणे घाटकोपर-वर्सोवा दरम्यान तब्बल ११ किलोमीटरचा राज्यातील पहिला मेट्रो प्रकल्प हाती घेतला होता. अकरा स्थानके असलेल्या या मार्गावर ८ जून २०१४ पासून मेट्रो सेवा सुरू झाली. आतापर्यंत या मार्गावर मेट्रो वनने ११ लाख फेऱ्या चालवल्या असून त्यामाध्यमातून ९७ कोटी प्रवाशांनी वाहतूक कोंडीशिवाय प्रवास केला आहे. सध्या या मार्गावर दररोज साडेचार लाख मुंबईकर प्रवास करतात.

अधुनिक सुविधा
या मेट्रोने गेल्या दहा वर्षात अनेक अत्याधुनिक सेवा दिल्या आहेत. त्यामध्ये देशातील पहिली मोबाईल तिकिटिंग सेवा, रूफ टाॅप सोलर असलेले पहिले मेट्रो स्थानक, व्हॉटस्ॲप तिकीट सुविधा अशा वेगवेगळ्या सेवा प्रवाशांना दिल्या आहेत.

एमएमआरडीच्या मेट्रोची प्रवासी संख्या उच्चांकी टप्प्यावर
अंधेरी- दहिसर- गुंदवली या २-अ आणि ७ या मार्गावर एमएमआरडीएकडून मेट्रो सेवा चालवली जाते. पश्चिम उपनगरातील या मेट्रोला गुरुवारी सर्वाधिक म्हणजे तब्बल २ लाख ६० हजार ४७१ जणांनी प्रवास केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com