विलेपार्ले-कांदिवलीतील  झालेल्या २ अपघातात दोघांचा मृत्यू !
Accident Newssakal

Accident News: विलेपार्ले-कांदिवलीतील झालेल्या २ अपघातात दोघांचा मृत्यू !

Andheri Crime: विलेपार्ले आणि कांदिवलीतील दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करून समतानगर आणि विलेपार्ले पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


बुधवारी दुपारी दोन वाजता विलेपार्ले येथील नेहरू रोड, पेट्रोल पंपाजवळील बसस्टॉपजवळ एका पादचाऱ्याला वरळीहून सीप्झच्या दिशेने जाणाऱ्या एका बसने धडक दिली होती. या अपघातात प्रदाम रघू सिंग (वय ४१) हा पादचारी गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विलेपार्ले-कांदिवलीतील  झालेल्या २ अपघातात दोघांचा मृत्यू !
Nashik Crime News : पिकअप मध्ये डांबून कत्तलीसाठी चाललेल्या 9 गायींची सूटका!

तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. विलेपार्ले पोलिसांनी अपघाताची नोंद करून बेस्टचा चालक राहुल रामचंद्र कांबळे याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.


दुसऱ्या अपघातात उबैदउल्लाह अनवारुलहक मनिहार या ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. उबैदउल्लाह हा भाईंदर येथे राहत असून त्याचा भंगारविक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी १ जूनला दुपारी बारा वाजता तो कामानिमित्त कांदिवलीला गेला होता. सायंकाळी चार वाजता तो त्याच्या बाईकवरून घराच्या दिशेने येत होता.

विलेपार्ले-कांदिवलीतील  झालेल्या २ अपघातात दोघांचा मृत्यू !
Crime News: पोलिसांची मोठी कारवाई, पाच लुटारुंना काही तासातच केले जेरबंद!

या वेळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाकूर संकुल गेटसमोर त्याच्या बाईकला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघतानंतर आरोपी चालक पोलिसांना अपघाताची माहिती न देता तसेच जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल न करता पळून गेला होता.

त्यामुळे उबैदउल्लाहला समतानगर पोलिसांनी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी त्याच्या भावाच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

विलेपार्ले-कांदिवलीतील  झालेल्या २ अपघातात दोघांचा मृत्यू !
Mumbai Crime News: धक्कादायक! आधी अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् नंतर लैगिंक अत्याचार; मुंबईतील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com