कोकण पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 
पोलिसांचे १ जुलैपर्यंत मनाई आदेश जारी

कोकण पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे १ जुलैपर्यंत मनाई आदेश जारी

ठाणे, ता. ८ (वार्ताहर) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकानंतर आता लवकरच शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत १ जुलैपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. यामध्ये नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ७ जून होती. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १२ जून आहे. २६ जून रोजी मतदान आणि १ जुलैला मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनेक पक्ष सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणीही गैरप्रकार करू नये, यासाठी मनाई आदेश पोलिस आयुक्तालयाने जारी केला आहे. त्यासाठी निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात शस्त्र परवानाधारकांनी शस्त्र बाळगण्यास आणि ने-आण करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ज्या शस्त्रधारकाला समितीने परवानगी दिली आहे, त्यांनाच मुभा असल्याचे नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com