ऐन निवडणुकीत राज्यात मद्याच्या महापूर!

ऐन निवडणुकीत राज्यात मद्याच्या महापूर!

ऐन निवडणुकीत राज्यात मद्याचा महापूर!

अवघ्या दोन महिन्यांत ३,४७५ कोटींचा महसूल


नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मार्चपासून मद्य तस्करी, मद्यसाठा याविरोधात कारवाई अभियान हाती घेतले होते. या कारवाईत गेल्या दोन महिन्यांत १० हजारांपेक्षा जास्त गुन्हे नोंदविले असून ९ हजारपेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातच एप्रिल आणि मे मध्ये मद्य विक्रीतून सरकारला तीन हजार ४७५ कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मद्य विक्रीत ९.३१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

निवडणुकीची घोषणा होताच राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्य तस्करांवर आणि मद्य साठा यावर करडी नजर ठेवून असते. कारण यामध्ये मद्य वाटपातून मतदारांना प्रलोभन दिले जाण्याची शक्यता असते. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात १७ मार्च २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कडेकोट बंदोबस्त आणि तयारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली. तेव्हापासून
मद्य तस्करांविरोधात ९ हजारपेक्षा जास्त गुन्हे नोंदविण्यात आले. ज्यामध्ये ८ हजारपेक्षा जास्त आरोपींना अटक करून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा केला. तरीही राज्यात गेल्या दोन महिन्यांत मद्यातून मिळणाऱ्या महसुलात तब्बल ९.३१ टक्क्यांची वाढ झालेली आहे.

..
महसुलात ३०० कोटींची वाढ
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्ययुक्त आणि अमली पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. या विभागाने एप्रिल २०२३ मध्ये १ हजार ३६८ कोटी आणि मे २०२३ मध्ये १ हजार ८११ कोटी असे या दोन महिन्यांत एकूण ३ हजार १७९ कोटी रुपयांचा इतका महसूल मिळविला होता; तर यंदा एप्रिलमध्ये १ हजार ५१९ कोटी आणि मेमध्ये १ हजार ९५६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला. त्यात गेल्या वर्षीच्या याच कालवधीतील मद्य विक्रीच्या तुलनेत यंदा २९६ कोटी रुपयांचा अधिक महसूल मिळाला आहे. यामध्ये ९.३१ टक्के अधिकचा महसूल शासनाला मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com