भिवंडीत यंत्रमाग व्यावसायिकांची २३ लाखांची फसवणूक

भिवंडीत यंत्रमाग व्यावसायिकांची २३ लाखांची फसवणूक

भिवंडीत यंत्रमाग व्यावसायिकांची २३ लाखांची फसवणूक
चौघांवर गुन्हा; बनावट कंपनीच्या नावाने लूट

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यावसायिकांची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यावेळी एका यंत्रमाग कापड व्यावसायिकाची शुक्रवारी (ता. ७) २३ लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल खंबानी,

कमल खंबानी, संजय आणि सुनील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, यामधील चौघा आरोपींनी आपापसांत संगनमताने भिवंडीतील कल्याण रोड येथील ट्राफिक ऑफिसजवळील गोपाळनगर परिसरात कच्चा कापड खरेदीसाठी राधे-राधे फॅब्रिक्स आणि रिद्धी-सिद्धी क्रिएशन्स या बनावट नावाने कार्यालय सुरू केले. दरम्यान, चौघांनी १४ मे रोजी भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिक मोहम्मद हुसेन मकबूल हुसेन खान यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून तब्बल २३ लाख ९२ हजार ६९५ रुपयांचे कच्चे कापड खरेदीचा व्यवहार करून मोहम्मदसह अनेकांची त्यांनी फसवणूक केली आहे. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी शांतीनगर पोलिसांत शुक्रवारी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अरुण घोलप करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com