मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली
नडगावच्या हद्दीमध्ये घटना; वाहतूक ठप्प, एकेरी वाहतूक सुरू

पोलादपूर, ता. ८ (बातमीदार) : महाड, पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाने शनिवारी (ता. ८) सकाळपासून जोरदार हजेरी लावली असून विजांच्या कडकडाटासह दिवसभर जोरदार पाऊस झाला. पावसाला सुरुवात होताच नडगाव गावच्या हद्दीमध्ये महामार्गालगत असलेला कड्याचा काही भाग महामार्गावर कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.
दरड कोसळत असतानाचा प्रसंग कॅमेरामध्येदेखील कैद झाला असून ती घटना सर्वत्र व्हायरल झाली आहे. दरड कोसल्यानंतर महामार्गावर एक तासाहून अधिक काळ कोकणाच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून महामार्गाच्या एका बाजूने वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू केली.
महामार्गालगत नडगावच्या हद्दीमध्ये असलेल्या या दरडीच्या ठिकाणी प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणे गरजेचे होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्या पावसातच दरडीचा काही भाग महामार्गावर कोसळला. दरड परिसरातील काही भाग नरम असल्याने येथे पुन्हा अशी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com