संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण!ु

संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण!ु

संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण!
विक्रोळी पार्क साईटमध्ये माळीणच्या पुनरावृत्तीची भीती
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः विक्रोळीच्य पार्क साईट परिसरातील डोंगर उतारावरील सिद्धेश्वर सोसायटी, जयमाला नगर, राहुल नगर, वर्षा नगर या धोकादायक परिसरात संरक्षक भिंत अपूर्णावस्थेत बांधून सोडण्यात आली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ‘माळीण’च्या घटनेची पुनरावृत्ती घडण्याची भीती येथील रहिवाशांना सतावत आहे.
विक्रोळी पार्क साईट परिसरात डोंगर उतारावर लाखो घरे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या परिसरातील घरांवर दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. आजपर्यंत दरडीने कित्येक जणांचे बळी घेतले आहेत. सिद्धेश्वर सोसायटी, जयमाला नगर, राहुल नगर, वर्षा नगर परिसरात ५० ते ६० हजार घरे आहेत. या परिसरात अद्याप संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नाहीत.
पालिका प्रशासन पावसाळ्यात रहिवाशांना फक्त सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा, असे आवाहन करते. या परिसरात शेकडो कुटुंबे कित्येक वर्षांपासून राहतात. त्यांनी दरड कोसळून जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या आहेत. प्रत्येक सरकार संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन देते, मात्र त्याची पूर्तता होत नाही. जीव गेल्यावर सांत्वन करण्यास येतात. लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन, म्हाडा व जिल्हा प्रशासनाला सर्वसामान्य जनतेची काही पर्वा नाही, अशी खंत येथील रहिवासी शांताबाई काळे यांनी व्यक्त केली.
पावसाळा आला की धोकादायक भाग असल्याचे सांगत रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिका करते. स्थलांतर म्हणजे नक्की काय? आम्ही जायचं कुठं? आमच्याकडे एवढे पैसे असते तर या धोकादायक भागात का राहिलो असतो. एक तर संरक्षक भिंत बांधा, अन्यथा सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करा, अशी मागणी जया जैसवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली.
या परिसरात संरक्षक भिंतीची कामे लवकरात लवकर करावीत, अशी मागणी रहिवासी सतत करीत आहेत. तसा त्यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे, पण म्हाडा, पालिका व जिल्हाधिकारी मागणी गांभीर्याने घेत नाहीत. जिल्हाधिकारी फक्त नोटीस देतात. पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगातात, मात्र कृती काहीच करीत नाहीत, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

या परिसरात काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी काही बांधत नाहीत, हाच प्रश्न सतावत आहे. संरक्षक भिंती तातडीने बांधाव्यात, यासाठी सतत पत्रव्यहार केला आहे, मात्र सरकार लक्ष देत नाही. याचा फटका सामान्य लोकांना बसतो.
स्नेहल सुनील मोरे
माजी नगरसेविका, शिवसेना उबाठा

या परिसरात ३० वर्षांपेक्षा अधिक वर्षे राहात आहोत. संरक्षक भिंती अपूर्ण बांधण्यात आल्या आहेत. पावसाळा आला की जीव टांगणीला लागतो. मुसळधार पाऊस पडल्यानंतर रात्र जागून काढावी लागते.
रंजना जाधव, स्थानिक रहिवासी

पावसाळ्यात शाळेत जाताना व उतरताना तारेवरची कसरत करावी लागते. पाण्याबरोबर सतत माती वाहत असते. त्यामुळे कित्येक जणांचा पाय घसरून बळी गेला आहे.
सरंक्षक भिंत व पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग बांधण्यात आला पाहिजे. तरच मृत्यूपासून सुटका होऊ शकते.
सक्षम कदम, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com