रिक्षाचालकाच्या तावडीतून अपहृत मुलाची सुटका

रिक्षाचालकाच्या तावडीतून अपहृत मुलाची सुटका

रिक्षाचालकाच्या तावडीतून अपहृत मुलाची सुटका
कल्याणमध्ये चिमुरड्याचा १२ तासांत शोध

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ ः भंगार गोळा करणारी महिला तिच्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह फूटपाथवर झोपली होती. याचा फायदा घेत शनिवारी (ता. ८) रात्री तिच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी १२ तासांच्या आत मुलाचा शोध घेऊन उल्हासनगर येथून त्याची सुटका केली.
चिमुकला अरबाज त्याच्या आईच्या कुशीत झोपलेला होता. उल्हासनगर येथील रिक्षाचालकाने या चिमुकल्याचे अपहरण का केले, याचा पोलिस तपास करत आहेत. दिनेश भैयालाल सरोज (वय ३५) व अंकितकुमार राजेंद्रकुमार प्रजापती (वय २५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दिनेश हा रिक्षाचालक असून अंकित हा टेलरचे काम करतो. फिर्यादी महिला आयेशा शेख (वय २०) या कल्याण पश्चिमेला व्हॉल मेमोरियल मेवेडिस्ट चर्च येथील केडीएमसी बस स्टॉपशेजारी फूटपाथवर राहतात. भंगार गोळा करण्याचे काम त्या करतात. शनिवारी रात्री १ ते ४ यादरम्यान आयेशा या आपल्या मुलांसह झोपल्या असता त्यांच्या मुलाचे अपहरण झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन तपास पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती याआधारे सापळा रचून पोलिसांनी दिनेश व अंकितकुमार यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच वेळी सहा महिन्यांचा अपहृत मुलगा अरबाज समीर शेख याची सुखरूप सुटका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com