म्हाडाच्या लॉटरीला आचारसंहितेचा ब्रेक

म्हाडाच्या लॉटरीला आचारसंहितेचा ब्रेक

म्हाडाच्या लॉटरीला आचारसंहितेचा ब्रेक
विधान परिषद निवडणुकीमुळे आता जुलैचा मुहूर्त

बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे आधीच विकासकामांना ब्रेक लागलेला असतानाच आत विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे म्हाडाच्या घरांच्या लाॅटरीला ब्रेक लागला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जूनमध्ये म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांची लाॅटरी काढण्यात येणार होती. त्यानुसार प्रशासनाने घरांची जमवाजमवही सुरू केली होती; मात्र अचानक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आता म्हाडाला जूननंतर जाहिरात काढावी लागणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिवाळीत, तर कोकण मंडळाने फेब्रुवारीत घरांची सोडत काढली होती. त्याचवेळी दरवर्षी प्रत्येक मंडळाची एक तरी घरांची लाॅटरी काढली जाईल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, मार्चमध्ये लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने घरांची लाॅटरी निवडणूक निकालानंतर जूनमध्ये मुंबई आणि कोकण मंडळाने जूनमध्ये घरांची लाॅटरी काढण्याची तयारी केली होती; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्याआधीच दोन दिवस मुंबई, नाशिक, कोकण या तीन विभागांतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्याचा निकाल २७ जूनला लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता असल्याने म्हाडाला मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांसाठी लाॅटरी काढता येणार नाही. परिणामी, ही लाॅटरी आता जुलै महिन्यात येऊ शकते, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
...
तीन महिन्यांचाच कालावधी
जूनअखेरीस विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिनेच लाॅटरी काढण्यासाठी म्हाडाच्या हाती असणार आहेत. या कालावधीत लाॅटरीचा कार्यक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
...
लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आदर्श अचारसंहिता लागू असल्याने घरांची सोडत काढता येणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतरच घरांच्या लाॅटरीबाबत निर्णय होईल.
- मारोती मोरे, मुख्याधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com