महायुतीच टेंशन वाढणार? दोन मतदारसंघात वायकर तर ४ मतदारसंघात  किर्तीकरांची आघाडी
Mumbai Loksabhasakal

Mumbai Loksabha: महायुतीच टेंशन वाढणार? दोन मतदारसंघात वायकर तर ४ मतदारसंघात कीर्तीकरांची आघाडी

Vidhansabha Election 2024 mumbai : जोगेश्वरी पूर्व या स्वतःच्या मतदारसंघात वायकर मागे पडले आहेत | Waikar did not get votes in his own constituency

Mumbai Loksabha Election 2024: उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर हे केवळ ४८ मतांनी पराभूत झाले आहेत. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये रवींद्र वायकर यांनी दोन मतदासंघात, तर अमोल कीर्तिकरांनी उर्वरित चार मतदारसंघात आघाडी घेतली आहे. जोगेश्वरी पूर्व या स्वतःच्या मतदारसंघात वायकर मागे पडले आहेत.

या आमदारांसाठी धोक्याची घंटा
मतदारसंघ-   जोगेश्वरी पूर्व  
आमदार- रवींद्र वायकर, शिवसेना (शिंदे)
रवींद्र वायकर स्वतःच्या मतदारसंघात  ११ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला  आगामी विधानसभा निवडणुकीत आव्हान उभे झाले आहे.  
अमोल कीर्तिकर -        ८३,४०९
रवींद्र वायकर  -  ७२,११८

.... 
मतदारसंघ-वर्सोवा
आमदार- डॉ. भारती लव्हेकर
या मतदारसंघात भाजपच्या आमदार   डॉ. भारती लव्हेकर यांना फारसा प्रभाव दाखवता आला नाही. कीर्तिकर यांना २१,०९० मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारती लव्हेकर यांचा आमदारकीचा मार्ग खडतर राहणार आहे.
कीर्तिकर     - ८०,४८७     
रवींद्र वायकर -   ५९,३९७ 
....
मतदारसंघ  -अंधेरी पूर्व
आमदार-ऋतुजा लटके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत लटके निवडून आल्या होत्या, मात्र त्यांच्या मतदारसंघात वायकर यांनी ९ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. आगामी विधानसभेचा त्यांचा मार्ग खडतर असणार आहे.
अमोल कीर्तिकर     -  ६८६४६
रवींद्र वायकर -  ७८४६४.....

 महायुतीच टेंशन वाढणार? दोन मतदारसंघात वायकर तर ४ मतदारसंघात  किर्तीकरांची आघाडी
Mumbai Traffic Update : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत बदल

यांनी राखला किल्ला
मतदारसंघ-  दिंडोशी 
आमदार- सुनील प्रभू
या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असताना कीर्तिकर यांना जेमतेम १ हजार ७११ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सुनील प्रभू यांच्यासमोर आव्हाने उभी राहू शकतात.
अमोल कीर्तिकर  -    ७७,४७९-
रवींद्र वायकर- ७५,७६८   
...
मतदारसंघ-  अंधेरी पश्चिम
आमदार- अमित साटम
भाजपचे आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या कीर्तिकरांना केवळ ७९ मतांची आघाडी मिळालेली आहे. हा आकडा जरी कमी असला तरी कीर्तिकरांना केवळ ४८ मतांनी पराभूत व्हावे लागले, हे विसरता येत नाही.  
अमोल कीर्तिकर      -   ७०,५२२
रवींद्र वायकर -  ७०,४४३    
....
या आमदारांनी राखला किल्ला
मतदारसंघ -गोरेगाव
आमदार- विद्या ठाकूर
या मतदारसंघात रवींद्र वायकर यांनी २३ हजार ७४२ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. त्‍यामुळे वायकर हे विजयापर्यंत पोहोचू शकले आहेत.
अमोल कीर्तिकर   -   ७०,५६२
रवींद्र वायकर -  ९४,३०४

 महायुतीच टेंशन वाढणार? दोन मतदारसंघात वायकर तर ४ मतदारसंघात  किर्तीकरांची आघाडी
Mumbai Vikhroli News: पाऊस पडत असल्याने डब्बा द्यायला आलेल्या चिमुकल्याला वडिलांनी थांबवून घेतलं, स्लॅब कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ  
विजयी - रवींद्र वायकर  शिवसेना (शिंदे गट )   ४,५२,५९६
पराभूत - अमोल कीर्तिकर शिवसेना (उबाठा)  ४,५२,६४४

 महायुतीच टेंशन वाढणार? दोन मतदारसंघात वायकर तर ४ मतदारसंघात  किर्तीकरांची आघाडी
Mumbai Rain Update: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रस्त्यांना नदीचे स्वरुप, यलो अलर्ट जारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com