पश्चिम द्रुतगती महामार्गावर
घोडागाड्यांच्या शर्यतीघोडागाड्यांच्या शर्यती

पश्चिम द्रुतगती महामार्गावर घोडागाड्यांच्या शर्यतीघोडागाड्यांच्या शर्यती

पश्चिम द्रुतगती महामार्गावर
घोडागाड्यांच्या शर्यती
एकाला अटक; विलेपार्ले पोलिसांची कारवाई
मुंबई, ता. ९ ः पश्चिम द्रुतगती महामार्गावर घोडागाड्यांच्या शर्यती लावण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून तक्रारीनंतर विलेपार्ले पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
मागील महिन्यात विलेपार्ले ते खेरवाडीदरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर घोडागाड्यांच्या शर्यती झाल्याची तक्रार पीपल फॉर एथिकल ट्रिटमेंट फॉर ॲनिमल (पेटा) या प्राणिमित्र संघटनेकडे आली होती. या शर्यतीचा व्हिडीओदेखील त्यांच्याकडे आला होता. त्यानंतर ‘पेटा’च्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी वीस दिवस शोध घेऊन ही शर्यत लावणाऱ्यांपैकी एका व्यक्तीला अटक केली आहे.
काही वर्षांपूर्वी हे प्रकार सुरू असल्याचे आढळून आले होते, त्यानंतर पोलिसांच्या कारवाईनंतर ते बंद झाले होते. मात्र, आता मागील महिन्यापासून या शर्यती पुन्हा सुरू झाल्याचे ‘पेटा’चे म्हणणे आहे. या व्हिडीओमध्ये किमान दोन घोडागाड्या एकमेकांशी शर्यत लावत असलेल्या दिसतात. त्यांना संरक्षण म्हणून त्यांच्या आजूबाजूला आयोजकांचे मोटरसायकलस्वारही दिसून येतात. पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत सिंह दहिया यांना यासंदर्भात ‘पेटा’च्या कार्यकर्त्यांनीदेखील मदत केली. अखेर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, २७९, २८९ आणि ३३६ नुसार तसेच ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल ॲक्ट’च्या कलम ११ नुसार गुन्हे दाखल केले असून चारही घोड्यांना ताब्यात घेतले आहे. याबद्दल ‘पेटा’च्या सुनयना बासू यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com