: मेट्रो-३ मार्ग लवकरच होणार सुरु, आजपासून होणार चाचणी
Mumbai Metro sakal

Mumbai Metro : मेट्रो-३ मार्ग लवकरच होणार सुरु, आजपासून होणार चाचणी

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम पाहणी करून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत आणता येणार आहे | आरडीएसओ रेल्वे प्रणालीच्या विकासासाठी तांत्रिक, अभियांत्रिकी आणि सुरक्षा या बाबींवर संशोधन करते.

Mumbai Metro: मेट्रो-३ मार्गाच्या आरे-बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेची चाचणी सुरू होणार आहे. रेल्वे क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधन डिझाईन आणि मानक संस्थेचे (आरडीएसएओ) अधिकारी या चाचणीला उपस्थित असणार आहेत.

यामध्ये मेट्रो गाड्यांच्या संचलनाबरोबरच स्थानकातील सुरक्षा, सुविधा आदी घटकांची तपासणी होणार आहे. या चाचणीमध्ये मेट्रो पास झाल्यानंतरच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम पाहणी करून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत आणता येणार आहे.

: मेट्रो-३ मार्ग लवकरच होणार सुरु, आजपासून होणार चाचणी
Pune Metro : मेट्रोने जा... पण स्थानकापर्यंत चालत या!

मेट्रो-३ ही भूमिगत मेट्रो मार्गिका कुलाबा-आरे अशी आहे; पण पहिल्या टप्प्यात आरे-बीकेसी या नऊ स्थानके असलेला साडेनऊ किलोमीटरचा टप्पा सुरू करण्यावर मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने भर दिला आहे

. त्यानुसार उद्यापासून आरडीएसओच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेट्रोच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रत्यक्ष मेट्रो गाड्या चालवून आवश्यक ती तांत्रिक, सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली जाणार असल्याची माहिती एमएमआरसीएलने दिली आहे. आरडीएसओ रेल्वे प्रणालीच्या विकासासाठी तांत्रिक, अभियांत्रिकी आणि सुरक्षा या बाबींवर संशोधन करते.

: मेट्रो-३ मार्ग लवकरच होणार सुरु, आजपासून होणार चाचणी
Pune Metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे ६८ टक्के काम पूर्ण; वाहतूक कोंडीमधून होणार सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com