झाडांचे आयुष्यही रामभरोसे

झाडांचे आयुष्यही रामभरोसे

ठाणे, ता. १० (वार्ताहर) : ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समितीत सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरू आहे. पोखरण रोडवर एक हजार बकुळीची आणि नागला बंदर चौपाटी या ठिकाणी एक हजार मियावाकी झाडे रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात येणार आहे. मात्र, लावलेल्या झाडांचे आयुष्य हे रामभरोसे असल्याचा पूर्वानुभव आहे. ठाण्यात पाच महिन्यांत तब्बल २०७ झाडे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर प्रत्येक झाडाची नोंद ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केलेली आहे. त्या‍मुळे लावण्यात येणाऱ्या दीड-दोन हजार झाडांपैकी किती सुरक्षित राहतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ठाण्यात मागील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या विक्रमी आकडा गाठलेला होता. तर यंदाही पावसाळ्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात झाड आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. १४ मेच्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडलेल्या होत्या. यामध्ये १४ मे रोजी दिवसभरात ४८ झाडे कोसळली, तर ३० हून अधिक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. रस्तोरस्ती झाडांचा पालापाचोळा साचल्याचे चित्र होते. अनेक वाहनांवर झाडे पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठाण्यात पावसाळा नसतानाही पाच महिन्यांत जुनी झाडे उन्मळून पडण्याच्या २०७ घटना घडल्या आहेत. त्यामुळे ठाण्यातील झाडांचे आयुष्यही रामभरोसे झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नऊ दिवसांत झाडे-फांद्या पडण्याच्या घटना
नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. काही प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसात जून महिन्याच्या सुरुवातीपासून ९ जूनपर्यंत ठाण्यात पडलेल्या झाडांमध्ये अनेक वाहने क्षतिग्रस्त झालेली आहेत.
२ जून : पाचपाखाडी येथील स्वामीनारायण ट्रस्टच्या बाजूला असलेल्या तळवळकर जिमजवळ जांभळाच्या झाडांची फांदी रस्त्यावर पडली.
४ जून : ठाणे पश्चिम येथील पोखरण रोड नंबर २, वसंत विहार या ठिकाणी गॅलेक्सो कंपनीसमोरील रस्त्यावर उभ्या केलेल्या दोन गाड्यांवर झाडाची मोठी फांदी पडली. यात डम्‍पर आणि बस क्षतिग्रस्त झाली.
७ जून : ठाणे पश्र्चिम येलि कॅडबरी जंक्शन जवळ हॅप्पी व्हॅली सर्विस रोडला गुलमोहर झाडाची मोठी फांदी इंटरनेट वाहिनीवर लटकली होती.
९ जून : ठाण्यातील नुरी दर्गाजवळील सानिया हॉलसमोर दोन चारचाकी वाहनांवर झाड पडले. यामध्ये दोन कार क्षतिग्रस्त झाली. तर दुसरी घटना ठाणे पश्चिम येथील चरई धोबी आळी येथील श्रीनाथ प्लाझा जवळील दत्त मंदिराच्या बाजूला झाड पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com