अ

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत बदल
१९ जूनपर्यंत अनेक मार्गांवर प्रवेश बंदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता १० : मानखुर्द वाहतूक विभागात बकरी ईदनिमित्ताने कुर्बानीसाठी बकरे वाहतूक केली जाते. ही वाहने मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील शिवाजीनगर जंक्शन, (लोटस जंक्शन), बैगनवाडी जंक्शन, आय.ओ.सी. जंक्शन मुंबई येथून येतात. त्‍यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहतुकीत बदल केले आहेत. ७ जूनपासून १९ जूनपर्यंत हे बदल लागू असणार आहेत.

या मार्गांवर प्रवेश बंदी
सर्व प्रकारच्या जड व माल वाहनांना (बेस्ट बस आणि जनावरे वाहतूक करणारी वाहने वगळून) २४ तास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
* वामन तुकाराम पाटील मार्ग
पांजरपोळ जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका
गेटसमोरील जंक्शनपर्यंत.
* गौतमनगर रोड :- शिवाजीनगर जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील
जंक्शनपर्यंत
* पेरीफेरी मार्ग: एरीस जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत
* देवनार रोड/गोवंडी स्टेशन पश्चिम रोड तानाजी मालुसरे चौकपासून गोवंडी रेल्वे स्टेशन रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत.

एक दिशा मार्ग
१६ जूनपासून १९ जूनपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत गोवंडी स्टेशन पश्चिम रोड तानाजी मालुसरे चौकपासून गोवंडी रेल्वे स्टेशन, गोवंडी स्टेशनपासून झटका गेटपर्यंत आवश्यकतेनुसार एकेरी वाहतूक करण्यात येईल.

पर्यायी मार्ग -
चामन तुकाराम पाटील मार्गाने पांजरपोळ जंक्शन येथून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटकडे जाणारी वाहने ही व्ही. एन. पुरव मार्ग, सायन पनवेल महामार्ग, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडचा वापर करतील.
गौतमनगर रोडने शिवाजीनगर जंक्शनपासून झटका गेटकडे जाणारी वाहने घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडने छेडा नगर जंक्शनने इच्छितस्थळी जातील.
पेरीफेरी मार्गावर एरीस जंक्शनपासून झटका गेटकडे जाणारी वाहने घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने छेडा नगर जंक्शनने इच्छित स्थळी जातील.
देवनार रोड/गोवंडी स्टेशन पश्चिम रोड-तानाजी मालुसरे चौकपासून जाणारी वाहने घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडने छेडा नगर जंक्शनने इच्छितस्थळी जातील.

पार्किंग मनाई -
* पेराफेरी मार्ग-एरीसजंक्शन पासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत.
* गोवंडी स्टेशन पश्चिम रोड-तानाजी मालुसरे चौकपासून त्या रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत.
* गौतमनगर रोड - शिवाजीनगर जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत.
* मधुकर कदम मार्ग-बैंगनवाडी जंक्शनपासून तानाजी मालुसरे चौकापर्यंत.
* वामन तुकाराम पाटील मार्ग - एन जी आचार्य मार्गावरील बोराबादेवी जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत, गोवंडी रेल्वे स्टेशन ब्रीजवरील सर्व मार्गावर दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास प्रतिबंध राहील.

पार्किंग व्यवस्था -
मनपा एम पूर्व विभागामार्फत पेरीफेरी रोडवरील कत्तलखाना आणि ६०० टैनामेंट बिल्डींगजवळ एका मोकळ्या जागेत जनावरे घेऊन येणारे व जनावरे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरती पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com