रविवारी रात्री पावसाचे धूमशान

रविवारी रात्री पावसाचे धूमशान

ठाणे, ता. १० (वार्ताहर) : रविवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर धरला. सोमवारी (ता. १०) पहाटे साडेपाचपर्यंत धूमशान घातले होते. या संततधार पावसामुळे शहरात झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नसल्याचे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती दिली. १ ते १० जून या कालावधीत ९०.३४ मिमी पाऊस पडला, तर मागील वर्षी याच कालावधीत पाऊस निरंक होता. रविवारी मध्यरात्री एका तासात २५.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. २४ तासांत तीन झाडे पडली, तर एका झाडाची फांदी पडल्याची घटना घडली. सोमवारी पहाटे नौपाड्यातील राम मारुती रोड, मढवी हाऊसजवळ, तर मार्केट रोडवरील ब्राह्मण सेवा हॉलच्या समोरील जांभळाचे मोठे झाड विठ्ठल मंदिराच्या शेडवरती पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com