ॲल्युमिनियमची तारा चोरणारी टोळी गजाआड

ॲल्युमिनियमची तारा चोरणारी टोळी गजाआड

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) : ॲल्युमिनियमच्या २५ लाखांच्या तारा चोरणाऱ्या ११ जणांच्या टोळीला मुद्देमालासह गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली कार, पिकअप आणि दोन मिनी टेम्पो असा एकूण २९ लाखांचा मुद्देमाल संशयित आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
नॅशनल पॉवरग्रिड अंतर्गत मुंबई ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून अंबरनाथला प्रकल्प राबवण्यात येत आहे. या कंपनीसोबत ट्रान्समिशनसाठी के. ई. सी. इंटरनॅशनल ही उपकंपनी काम करत आहे. या कंपनीचे अंबरनाथ एमआयडीसीतील प्रकल्पाचे काम सुरू असताना २७ आणि २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास ट्रान्समिशनसाठी लावलेल्या २५ लाखांच्या ॲल्युमिनियमच्या तारा चोरट्यांनी चोरल्या होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक अशोक भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासाच्या मदतीने ११ संशयितांना अटक केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या घटनेतील सराईत गुन्हेगार तौकीर जमालुद्दीन खान याला धारावी येथून अटक केली. त्याची सखोल चौकशी करून सरोजकुमार जयस्वार, गणेश पटेल, अरुण सिंग, आकाश मीना, समीर खान, विकास म्हेत्रे, परवेझ खान, शिवकरण गुप्ता, रामलाल पटेल, कादर खान आणि सद्दाम अली यांना अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com