अहमदाबादची युनायटेड कोटफॅब
३६ कोटी रुपयांचा आयपीओ

अहमदाबादची युनायटेड कोटफॅब ३६ कोटी रुपयांचा आयपीओ

युनायटेड कोटफॅबचा
३६ कोटींचा ‘आयपीओ’

मुंबई, ता. १० : वाया गेलेला कापूस आणि धागे यांच्यापासून उच्च दर्जाचे पक्के सुती धागे बनवणाऱ्या अहमदाबादच्या युनायटेड कोटफॅब या कंपनीचा ३६ कोटी ३० लाख रुपयांची प्राथमिक भागविक्री योजना (आयपीओ) बाजारात येणार आहे. या शेअरची नोंदणी बीएससीच्या एसएमई विभागात केली जाईल. दहा रुपये दर्शनी मूल्याच्या या शेअरची किंमत ७० रुपये आहे. १३ ते १९ जूनदरम्यान या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येईल. या आयपीओमध्ये ५१ लाख ८४ हजार शेअर विक्रीला आणले जातील. यात किमान दोन हजार शेअरसाठी गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओमध्ये प्रत्येकी २४ लाख ६२ हजार शेअर बड्या गुंतवणूकदारांसाठी तसेच सामान्य गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.

वाया गेलेल्या कापसापासून पक्के धागे करण्याचे काम पर्यावरण जपणुकीसाठी केले जाते, असे कंपनीचे एमडी व प्रवर्तक गगन मित्तल यांनी पत्रकारांना सांगितले. कंपनी केवळ पांढऱ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या जाडीचे धागे तयार करते. ते वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनेबल वस्त्रप्रावरणांच्या निर्मितीसाठी तसेच जीन्स, कपडे आदींमध्ये वापरले जातात. अरविंद मिल्स, वेल्पसन आदी मोठ्या कंपन्या युनायटेड कोटफॅबचे ग्राहक आहेत.

आयपीओच्या रकमेतील २४ कोटी रुपये खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी, तर आठ कोटी रुपये कंपनीच्या अन्य सामान्य गरजा भागवण्यासाठी वापरले जातील. त्यामुळे आयपीओनंतर कंपनीला कच्चा माल मोठ्या प्रमाणावर मिळेल व त्यांचा नफाही वाढेल, असेही ते म्हणाले. देशात सध्या पुनर्वापरातून पक्के धागे बनवण्याचा कल वाढतो आहे. गुजरातमधील बाजारपेठेतही आमचा मोठा वाटा आहे. आमचा कारखाना यांत्रिक असल्यामुळे तेथे माणसे कमी लागतात आणि खर्चही कमी होतो, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com