मुंबईत पडझडीच्या घटना

मुंबईत पडझडीच्या घटना

मुंबईत पडझडीच्या घटना
५३ ठिकाणी झाडे, ६ ठिकाणी घरे कोसळले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः मुंबईत पहिल्याच जोरदार पावसात पडझडीच्या घटना घडल्या. ५३ ठिकाणी झाडे, ६ ठिकाणी घरे कोसळल्‍यामुळे पालिका सतर्क झाली आहे. मुंबईसह राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्‍याने पालिकेने उपाययोजना केल्‍या आहेत.
जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुंबई शहरात १७ ठिकाणी, पूर्व उपनगरात ७, तर पश्चिम उपनगरात २७ ठिकाणी अशा ५३ ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. यात कुणीही जखमी झाले नाही; तर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी २ ठिकाणी घर-घराचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये विक्रोळीत स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला.
पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोरदार पाऊस झाल्यास उपाययोजना करा, रस्त्याकडे लक्ष द्या, खड्डे पडलेच तर तातडीने भरा, अशा सूचना दिल्या आहेत. मुंबईत ९८ फ्लडिंग स्पॉट आहेत. तेथे भरलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत. जोरदार पाऊस झाल्‍याने पाणी भरल्‍यास लवकरात लवकर निचरा करण्यासाठी टीम तैनात ठेवण्यात येणार आहे.

वाहतुकीला फटका
मुंबई शहर आणि उपनगरांत रात्री ८ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे दादर टीटी, हिंदू कॉलनी, हिंदमाता, लालबाग, वरळी, परळ, शिवडी ते वडाळा येथे, तर पूर्व उपनगरांत टागोरनगर विक्रोळी, सकीनाका, मुलुंड, भांडुप, विद्याविहार आणि पश्चिम उपनगरांतून दहिसर, चेक नाका, अंधेरी, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, मालाड या भागातून पाणी साचल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. या ठिकाणी पालिकेकडून पाण्याचा निचरा केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com