पुढील स्थानक दर्शवणारी यंत्रणा करतेय चुकीचे मार्गदर्शन  !

पुढील स्थानक दर्शवणारी यंत्रणा करतेय चुकीचे मार्गदर्शन !

लोकल प्रवाशांना मनस्ताप
‘इंडिकेटर’ करतंय चुकीचे मार्गदर्शन; प्रवाशांचा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१०: धावत्या लोकलमध्ये इंडिकेटरमध्ये चुकीचे स्थानक दर्शवितात, तर कुठे बंद अवस्थेत असल्याने मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर हे दोष सर्वाधिक जास्त दिसून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.

मुंबईकरांना लोकल प्रवासात कधी गर्दीचा सामना, तर कधी तांत्रिक बिघाडाचा फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलमधील इंडिकेटरमध्ये चुकीचे स्थानक दर्शवित असल्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय इंडिकेटर बंद अवस्थेत असल्याने प्रवास करताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे. त्यातच काही दिवसांपासून स्थानकात उद्घोषणा होत नसल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. दुसऱ्या बाजूला लोकल डब्यात पुढील स्थानक, अंतिम स्थानक सांगणाऱ्या यंत्रणा कार्यरत नसल्याचे देखील अनेकदा आढळून आले आहे, तर काही यंत्रणांमध्ये जे स्थानक पुढे येणार आहे, हे न दाखवता येऊन गेलेले स्थानक अथवा तांत्रिक बिघाडामुळे एकच स्थानक वारंवार दर्शवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

...
प्रवाशांना मनस्ताप
पुढील स्थानक कोणते? ते कोणत्या दिशेला येणार? याबाबत लोकलमध्येच माहिती देणारे इंडिकेटरवर उद्गघोषणा होतात, मात्र सद्यस्थितीत अनेक लोकलमधील इंडिकेटर सुस्थितीत नसल्याने ही सुविधा प्रवाशांसाठी असुविधा ठरत आहे. इंडिकेटर बंद असणे, इंडिकेटरवर पुढील स्थानक चुकीचे दाखवणे, काही वेळा इंडिकेटर अर्धवट सुरू असणे, असे प्रकार घडत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com