डोक्यात दगड घालून प्रेयसीची हत्या

डोक्यात दगड घालून प्रेयसीची हत्या

बोईसर, ता. ९ (बातमीदार) : किरकोळ भांडणातून प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना बोईसर-मुरबे येथे घडली आहे. या घटनेनंतर फरारी आरोपीला सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुरबे गावात राहणारे स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमीत तांडेल दोघेही तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करीत होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आठच्या सुमारास दोघे आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले होते. कुंभवली गावाजवळ रस्त्यातच दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी सुमीत याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून रक्तबंबाळ केले. यावेळी जमलेल्या नागरिकांना दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो, असे सांगून तांडेलने स्नेहाला दुचाकीवर बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परिसरात घेऊन गेला. यावेळी दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीयांना दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दुपारी दोनच्या सुमारास स्नेहाचा मृतदेह खाजन परिसरात सापडला. त्यामुळे बोईसर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला सातपाटीतून अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com