‘सकाळ अवतरण’ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक!

‘सकाळ अवतरण’ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक!

‘सकाळ अवतरण’ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक!
छंदश्री आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे पुरस्कार जाहीर; शुक्रवारी पुण्यात वितरण समारंभ

मुंबई, ता. १० : गेल्या आठ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंकाच्या यावर्षीच्या स्पर्धेत ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट अंकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सकाळ’च्या ‘Money’ या अर्थविषयक अंकालाही ‘स्व. कमलाबाई रसिकलालजी धारिवाल पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार असून, गोव्यातील ‘गोमंतक’ दिवाळी अंकातील राजू नायक यांच्या ‘कलावंत’ या लेखासाठी उत्कृष्ट सामाजिक लेखाचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता. १४) पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. समाजजीवनाला प्रभावित करणाऱ्या विषयांवर दरवर्षी दिवाळी अंक प्रकाशित करण्याची ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीची परंपरा आहे. एका विषयाचे अनेक पदर ‘अवतरण’ दिवाळी अंक उलगडून दाखवत असतो. २०२३च्या दिवाळी अंकात ‘विचारधारा’ या विषयांतर्गत अभ्यासक, लेखक, साहित्यिक, विचारवंतांनी धर्मवाद, वसाहतवाद, दैववाद, पर्यावरणवाद, विज्ञानवाद, गांधीवाद, अध्यात्मवाद, श्रद्धावाद, सांस्कृतिक वाद, प्रांतवाद, चंगळवाद, लैंगिकतावाद अशा विविध विषयांवर चिकित्सक भाष्य केले आहे. या अंकाला मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघासह अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवले. आता छंदश्रीच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराचीही मोहर उमटली आहे.
कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या नावाने त्यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा घेण्यात येते. २०२३मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांचे पुरस्कार संस्थेने जाहीर केले असून, पुरस्कार वितरण सोहळा मसापचे अध्यक्ष मिलिंद जोशी, लायन्सचे प्रांतपाल विजय भंडारी, माणिकचंद उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाशशेठ धारिवाल, इनफ्लक्स ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर शिवाजीराव चमकिरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे हे समीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रथम क्रमांकाचे स्व. कमलाबाई रसिकलाल धारिवाल १४, सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे दोन, जीवनगौरव आठ, द्वितीय क्रमांकाचे इनफ्लक्स ग्रुपचे १४ व उत्तेजनार्थ सहा अशा विविध पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे संयोजक दिनकर शिलेदार यांनी कळवले आहे.

छायाचित्र : ‘सकाळ अवतरण’ दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ MUM24E55432

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com