‘चांद्रयान’ बालकवितासंग्रह प्रकाशित

‘चांद्रयान’ बालकवितासंग्रह प्रकाशित

सूर्यकांत मालुसरे यांचा
‘चांद्रयान’ बालकवितासंग्रह प्रकाशित
मुंबई : नॅशनल लायब्ररी वांद्रे, वंदना प्रकाशन मुंबई व कोमसाप विलेपार्ले शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यकांत मालुसरे यांच्या ‘चांद्रयान’ या बालकवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दत्ता पवार, विद्या कार्यवाह, नॅशनल लायब्ररी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, माजी दूरदर्शन निर्माता मोहनदास मुंगळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा नाईक, डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे विधिसल्लागार ॲड. यशवंत कदम, प्रा. सतीशचंद्र चिंदरकर उपस्थित होते. मालुसरे हे हाडाचे गुरुजी असून त्यांच्या मनात कायम विद्यार्थी असल्याने या बालकविता लिहिल्या गेल्या आहेत. त्यात विज्ञान ते भगवानपर्यंतच्या कविता आहेत. अशा संस्कारक्षम कविता निर्माण व्हायला हव्यात, अशा शब्‍दांत प्रमुख पाहुण्या नमिता कीर यांनी या पुस्‍तकाचे कौतुक केले.
-----------------------------------
महापारेषणचा वर्धापन दिन उत्साहात
पारितोषिक वितरण समारंभ थाटात
मुंबई, दि. १० : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा १९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते. सुरुवातीला उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
प्रास्ताविकात महापारेषणचे संचालक सुगत गमरे म्हणाले, ‘‘कंपनीची संस्कृती व कर्मचाऱ्यांमध्ये एकसंघ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे, सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कंपनीचा विकास साधावा, या हेतूने महापारेषणतर्फे वर्धापन दिन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा त्यामागचा हेतू आहे.’’
डॉ. संजीव कुमार म्हणाले, ‘‘महापारेषण ही देशात सर्वोत्तम पारेषण कंपनी आहे. महापारेषणने ड्रोनचा वापर सुरू केला आहे. हा ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्वेक्षण व देखरेख करण्यासाठी चांगला निर्णय ठरला आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभागस्तरापासून सांघिक कार्यालयस्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू केली आहे. भविष्यातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरू राहील,’’ असे ते म्‍हणाले.
ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम यावेळी सादर केले. जनसंपर्क विभागाच्या समन्वयातून महापारेषणच्या सर्वंकष कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या चित्रफितीने वातावरण ऊर्जामय झाले. प्रसिद्ध गायक श्रीकांत नारायण व उत्तरा केळकर यांच्या गीतांनी कार्यक्रमाला बहार आली.
-------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com