स्त्री जातीचे जिवंत अर्भत सापडले

स्त्री जातीचे जिवंत अर्भत सापडले

स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडले
अंधेरीतील घटना; अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अंधेरी, ता. १० (बातमीदार) ः स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडल्याने अंधेरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. या अर्भकाला सुरक्षेकामी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथेच तिच्यावर उपचार सुरू आहेत. अज्ञात पालकांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे.
रविवारी सकाळी पावणेदहा वाजता मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला अंधेरीतील लोखंडवाला, बॅक रोडवर एक नवजात अर्भक सापडले असून पोलिस मदत हवी आहे, असा कॉल आला होता.
वर्सोवा पोलिसांची एक टीम घटनास्थळी रवाना झाली होती. घटनास्थळी गेल्यानंतर प्रदीपकुमार यादव नावाच्या व्यक्तीने पोलिसांना कॉल केल्याचे सांगून तिथे एक नवजात अर्भक पडल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथून एक स्त्री जातीच्या दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला ताब्यात घेतले. या अर्भकाबाबत आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता त्याच्याविषयी कोणालाही काहीच माहिती नव्हते. ते अर्भक जिवंत असल्याने तिला तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मुलीचा जन्म लपविण्याच्या उद्देशाने तिच्या पालकांनी तिचा त्याग करून तिला रस्त्याच्या कडेला टाकून पलायन केले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरून पळून गेलेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com