टिटवाळ्यात वीजचोरांविरोधात मोहीम

टिटवाळ्यात वीजचोरांविरोधात मोहीम

Published on

कल्याण, ता. २ (वार्ताहर) : महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम सातत्याने सुरू आहे. जूनमध्ये उपविभागातील मांडा, गावेली, कोन आणि खडावली शाखा कार्यालयांतर्गत १४७ जणांवर धडक कारवाई करण्यात आली. यात ५९ लाख २४ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा टाळणाऱ्या ६० जणांविरूद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली टिटवाळा उपविभागात वीजचोरी शोधमोहीम नियमितपणे सुरू आहे. या मोहिमेत मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत ५० जणांकडे १८ लाख ५३ हजार ५१० रुपये, कोनगाव शाखा परिसरातील ४३ जणांकडे २८ लाख ७८ हजार १६० रुपये, गोवेली शाखा कार्यालयाच्या अंतर्गत २८ जणांकडे ९ लाख ५१ हजार ५३० रुपये आणि खडावली शाखा परिसरातील २६ जणांकडे दोन लाख ४० हजार ८८० रुपयांची वीजचोरी आढळून आली. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत‍ नोटीस बजावण्यात आली. परंतु, विहीत मुदतीत या रकमेचा भरणा टाळणाऱ्या ६० जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंते तुकाराम घोडविंदे व अभिषेक कुमार, कनिष्ठ अभियंते अलंकार म्हात्रे आणि सचिन पवार यांच्या चमुने ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.