विवा कट्ट्यावर रंगणार ‘रस्ता, प्रवास आठवणींचा’

विवा कट्ट्यावर रंगणार ‘रस्ता, प्रवास आठवणींचा’

Published on

विवा कट्ट्यावर रंगणार ‘रस्ता, प्रवास आठवणींचा’
विरार, ता. २ (बातमीदार) : यंग स्टार्स ट्रस्ट आणि समाज मंदिर ट्रस्ट, वसई यांच्या संयुक्त विद्यमाने विवा कट्ट्यावर मिती ग्रुप आयोजित उत्तरा मोने यांचा ‘रस्ता, प्रवास आठवणींचा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. कविता, गाणी आणि अभिवाचनातून आयुष्याच्या वाटचालीतील काही क्षणचित्रांची यातून त्या मांडणी करणार आहेत. रविवारी (ता. ७) सायंकाळी पाच वाजता समाज मंदिर सभागृह, न्यू इंग्लिश स्कूलसमोर, वसई पश्चिम येथे विवा कट्ट्याचे ६७ वे पुष्प गुंफले जाणार आहे. या कार्यक्रमाची संहिता मुकेश माचकरांची असून संकल्पना व कविता सादरीकरण विनय शिर्के करणार आहेत. अभिनेता सौरभ गोखले, गायक श्रीरंग भावे, गायिका दीपाली देसाई हे कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुया गरवारे-धारप करणार आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक प्रकाश वनमाळी, मकरंद सावे, स्वाती जोशी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.