फेरपरीक्षेच्या गुणपत्रिकेसाठी न्यायालयात धाव

फेरपरीक्षेच्या गुणपत्रिकेसाठी न्यायालयात धाव

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील एका विषयात नापास झाल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाविरोधात (एमयूएचएस) लढा देणाऱ्या विद्यार्थिनी प्रात्यक्षिक फेरपरीक्षेच्या गुणांसह सुधारित गुणपत्रिकेसाठी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २०२३च्या एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत प्रसूती आणि स्त्रीरोग विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थिनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हा सुनियोजित कटाचा भाग असून जाणूनबुजून परीक्षेत नापास केल्याचा आरोप तिने केला होता. पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने ३० मे रोजी नव्याने परीक्षा घेण्याचे आदेश एमयूएचएसला दिले होते. त्यानुसार ७ जून रोजी झालेल्या परीक्षेत उत्कृष्ट गुणांसह विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याने प्रात्यक्षिक फेरपरीक्षेचे गुण नोंदवून सुधारित गुणपत्रिका देण्याचे आदेश न्यायालयाने एमयूएचएसला दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत विद्यार्थिनीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.