आता डोंबिवली, ठाण्यात रेस्टॉरंट ऑन व्हील्स

आता डोंबिवली, ठाण्यात रेस्टॉरंट ऑन व्हील्स

Published on

आता डोंबिवली, ठाण्यात रेस्टॉरंट ऑन व्हील्स
दादर दरबार अभिनव संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : अवघ्या कमी दिवसांत प्रवाशांच्या पसंतीला उतरलेला ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ येत्या तीन ते चार महिन्यांत डोंबिवली स्थानकात सुरू होणार आहे. याशिवाय ठाणे आणि कल्याण स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. दादर रेल्वे स्थानकावर ‘दादर दरबार’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मध्य रेल्वेने १८ ऑक्टोबर २०२१ पासून मुंबईतील सीएसएमटीच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मबाहेर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले होते. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्‍या रेल्वे डब्यात तयार केले आहे. ज्याला बोगी-वोगी असे नाव मध्य रेल्वेकडून देण्यात आले, मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाच्या कामामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘रेस्टाॅरंट ऑन व्हील’ बंद असल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला होता, मात्र एलटीटी आणि दादर स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्यात आले आहे. दादरच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ला प्रवाशांचा आणि पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ला ‘दादर दरबार’ असे नाव देण्यात आले आहे.

दादर दरबारची वैशिष्ट्ये
७० जणांची बसण्याची आसन व्यवस्था
- नवीन आकर्षक आंतरिक नक्षीकाम
- शाकाहारी, मांसाहारी दोन्ही पद्धतीचे आहार उपलब्ध
- इतर हॉटेलच्या तुलनेत माफक दर

लवकरच निविदा
दादर, एलटीटीनंतर आता मध्य रेल्वेने डोंबिवली स्थानकात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेतला होता. निविदासुद्धा काढण्यात आली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत डोंबिवली स्थानकात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू होणार आहे. याशिवाय ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे कामाला लागली आहे. यासंदर्भात लवकरच निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.