पाणीपट्टी वसुलीत दोन कोटींची घट

पाणीपट्टी वसुलीत दोन कोटींची घट

पाणीपट्टी वसुलीत दोन कोटींची घट
ठाणे पालिकेला अपयश, आता मीटरप्रमाणे घेणार बिल

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २ : ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती सुरळीत होण्यासाठी पालिकेकडून मालमत्ता, पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत असले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टी वसुलीत दोन कोटींची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत १३ कोटी २३ लाखांची वसुली केली होती. त्यामध्ये यंदा ११ कोटी ६४ लाख ६५ हजारांची वसुली झाली आहे.

ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपट्टी वसुलीत फारसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे पाणी विभागातील वसुलीसाठी प्रशासनाने विशेष मेहनत घेऊनही हा विभाग वसुलीत पिछाडीवर पडल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ठाणे शहराला आजच्या घडीला ५८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष, स्टेम ११५, एमआयडीसी १३५ आणि स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर पाणी रोज उचलले जाते. पालिकेने पाणी गळती रोखण्याबरोबरच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठीही प्रयत्न केले आहेत, मात्र झोपडपट्टी भागात आजही या मीटरनुसारच बिलांची वसुली होत नाही. त्यामुळे आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

पालिकेची झालेली वसुली
मीटरप्रमाणे सध्याच्या घडीला दोन कोटी ५० लाख ७६ हजार ८८४ रुपयांची वसुली झाली आहे, तर ज्यांच्याकडे मीटर नाहीत, त्यांच्याकडून आतापर्यंत सात कोटी ४७ लाख १८ हजार ७१३ रुपयांची वसुली झाली आहे, तर ऑनलाईन पद्धतीने पाणी बिलांचा भरणा केला असून एक कोटी ४७ लाख ५६ हजार ९१७ रुपयांची वसुली झाली आहे. एप्रिल ते जूनअखेर ११ कोटी ६४ लाख ६५ हजार १५२ रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
.........................
आता मीटरप्रमाणे धाडले जाणार बिल
यापूर्वी ठराविक प्रमाणात मीटरप्रमाणे बिल वसुली केली जात होती, परंतु आता शहरात लावण्यात आलेल्या एक लाख सात हजार मीटरधारकांना आता मीटरप्रमाणे बिल धाडले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com