तरुणीची  हत्या

तरुणीची हत्या

Published on

अंधेरीत तरुणीची हत्‍या
मैत्री तोडल्‍याच्या रागातून मित्राचे कृत्‍य
अंधेरी, ता. ३ (बातमीदार) ः मैत्री तोडल्‍याच्या रागातून एका १८ वर्षांच्या तरुणीची तिच्याच मित्राने मारहाण आणि नंतर गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात घडली. सारा अम्रान इम्रान सय्यद असे या तरुणीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी मित्र झैब ख्वाजा हुसैन सोलकर (२२) याला सहार पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीला स्‍थानिक न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपीच्या वडिलांनी त्याला सहार पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना रविवारी (ता. ३०) पहाटे साडेचार वाजता अंधेरीतील मरोळ नाका, चिमटपाडा, पंजाब डेअरीसमोरील कादरी हाऊसमध्ये घडली. इर्शाद लियाकतअली सैय्यद हे टेम्पोचालक असून कुटुंबीयांसोबत अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड, अशोक टॉवरजवळील सुलोचनाबाई चाळीत राहतात. सारा ही त्यांच्या भावाची मुलगी असून ती कादरी हाऊसमध्ये राहते. गेल्या तीन वर्षांपासून सारा आणि झैब हे दोघेही एकमेकांच्या परिचित असून त्यांची चांगली मैत्री होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होते, त्यामुळे तिने मैत्रीचे संबंध तोडून टाकले होते. रविवारी पहाटे साडेचार वाजता तो तिच्या घरी आला होता. तिच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर कपड्याने साराची गळा आवळून हत्या केली होती. यावेळी साराचा भाऊ आणि बहीण हॉलमध्ये होते. या हत्येनंतर त्याने स्वतःवर ब्लेडने हल्ला केला. काही वेळानंतर तो तेथून पळून गेला होता. हा प्रकार सकाळी उघडकीस येताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिच्या नातेवाईकांनी तिला कूपर रुग्‍णालयामध्ये दाखल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.