चार राज्यांतून ३२७ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त

चार राज्यांतून ३२७ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त

चार राज्यांतून ३२७ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त
अंडरवर्ल्डशी संबंधित टोळी अटकेत

नालासोपारा, ता. ३ (बातमीदार) : महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात, उत्तर प्रदेश या चार राज्यांत अमली पदार्थ बनवून, त्याची विक्री करणाऱ्या अंडरवर्ल्डशी संबंधित टोळीचा पर्दाफास करण्यात मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या काशी मिरा क्राईम ब्रँच एकच्या पथकाला मोठे यश आले आहे. या पथकाने तब्बल दीड महिना अथक परिश्रम करून १५ आरोपींना अटक करून ३२७ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. याशिवाय तीन पिस्तूल, एक रिव्हॉल्वर, ३३ जिवंत काडतुसे जप्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १५ मे रोजी क्राईम ब्रँच युनिट एकचे पथक गस्त घालीत असताना ठाणे घोडबंदर मार्गे मिरा भाईंदर शहरात अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्यावर या कारवाईला सुरुवात झाली. एका गाडीत वसईतील शोएब आणि निकोलेश या दोन आरोपींसह २ कोटी रुपये किमतीचे एक हजार ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ पोलिसांना सापडला. गुन्ह्याचे रॅकेट देशातील विविध राज्यात पसरलेले असल्याचे प्राथमिक पोलिस तपासात उघड झाल्यावर वेगाने चक्रे फिरवण्यात आली. त्यातून चार राज्यांत छापे मारत आरोपींना ताब्यात घेतले. यातील आरोपींचे अंडरवर्ल्डशी संबंध असून, हवालाचा पैसा यात वापरला जात असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील अभिषेक ऊर्फ शुभम सिंह याला १ जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून अटक करण्यात आली. त्यानंतर आज याबाबत माध्यमांना माहिती देण्यात आली. या कामगिरीमुळे क्राईम ब्रँचच्या युनिट एकवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
...
आरोपींची नावे अशी
शोएब हनिफ मेमन (वसई), निकोलेश लिओफ्रेड टायटस (वसई), दयानंद ऊर्फ दया माणिक मुद्दनार (हैदराबाद, तेलंगण), नसीर ऊर्फ बाबा जानेमिया शेख (हैदराबाद, तेलंगण), घनश्याम रामराज सरोज (यूपी), मोहम्मद शकील मोहम्मद मोईन (हैदराबाद, तेलंगण), भरत ऊर्फ बाबू सिद्धेश्वर जाधव (शहापूर, महाराष्ट्र), झुल्फिकार ऊर्फ मूर्तझा मोसीन कोठारी (गुजरात), बाबू तौफिक खान (यूपी), मोहम्मद नदीम मोहम्मद शफीक खान (आझमगड, यूपी), एहमद शाह फैसल सेफिक आझमी (जामगड, यूपी), अमीर तौफिक खान, मोहम्मद शादाब मोहम्मद शमशाद खान, आलोक वीरेंद्र सिंह (सर्व रा. आझमगड, यूपी), अभिषेक ऊर्फ शुभम नरेंद्र प्रताप सिंह (जोनपूर, यूपी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com