लामखडे यांच्या जयंतीनिमित्त क्रीडापटूंचा गौरव

लामखडे यांच्या जयंतीनिमित्त क्रीडापटूंचा गौरव

Published on

लामखडे यांच्या जयंतीनिमित्त क्रीडापटूंचा गौरव

शिवडी, ता. ३ (बातमीदार) : साठ-सत्तरच्या दशकात मुंबई बंदरातून स्मगलिंग करणाऱ्या अनेकांना मुंबई कस्टमचे जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांनी धडा शिकवला आहे. त्यांची मंगळवारी (ता. २) मुंबई कस्टमच्या दयाशंकर सभागृहामध्ये जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सीमा शुल्कचे प्रधान मुख्य आयुक्त पी. के. अग्रवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यानिमित्त परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारात विशेष कामगिरी बजावणाऱ्या कस्टम्स विभागाच्या क्रीडापटूंना जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या नावाने विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पी. के. अग्रवाल यांनी दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे मुंबई कस्टमचे हिरो होते. पुढील वर्षापासून (ता. २) जुलै हा दिवस कस्टम्समध्ये क्रीडा दिवस म्हणून व जुलैचा पहिला आठवडा हा क्रीडा सप्ताह (स्पोर्ट्स वीक) म्हणून साजरा केला जाईल, असे सांगितले. तसेच जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव या त्यांच्या जन्मगावी असलेल्या पुतळ्याजवळ एक महिन्यात सरकारी इतमामात कस्टमचा अधिकृत ध्वज फडकवला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी पद्मश्री उदय देशपांडे यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. कस्टममध्ये कामाला असताना त्यांना क्रीडा क्षेत्रात आलेल्या आठवणींना उजाळा दिला. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्लेरन्स लोबो, संतोष पेडणेकर, मुख्य आयुक्त सुनील जैन, अतिरिक्त आयुक्त अरविंद घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशस्विनी भालेराव यांनी केले, तर आभार अजित शिंदे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.