नेरूळमधील १०९ कुटुंबांचा उपोषणाचा इशारा

नेरूळमधील १०९ कुटुंबांचा उपोषणाचा इशारा

Published on

नेरूळमधील १०९ कुटुंबांचा उपोषणाचा इशारा

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : नेरूळ येथील कॉस्मोपॉलिटन-२ सोसायटीतील १०९ कुटुंबे राहत असलेल्या एका इमारतीला अतिधोकादायक (सी-१ श्रेणी) घोषित करून रहिवाशांना तातडीने घरे खाली करण्याची नोटीस नवी मुंबई महापालिकेने दिली आहे. त्याविरोधात उद्या (ता. ४) उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘रहिवाशांना तातडीने घरे खाली करण्याची नोटीस दिली आहे. सोसायटीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या २७ रो-हाऊसधारक व २० दुकानदारांना मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण दिले आहे,’ असा आरोप करीत महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात १०९ कुटुंबांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. सिडको, महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला वैतागलेल्या १०९ कुटुंबांतील ५०० सदस्य अखेर महापालिका मुख्यालयासमोर ४ जुलै रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्यानंतर गरज पडल्यास ११ जुलैपासून सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक आमरण उपोषणास बसणार आहेत, असे सोसायटीने कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.