‘लाडकी बहीण योजना गतिमानतेने राबवा!

‘लाडकी बहीण योजना गतिमानतेने राबवा!

Published on

‘लाडकी बहीण’ योजना गतिमानतेने राबवा!

पालघर, ता. ३ (बातमीदार) ः राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ गतिमान पद्धतीने व पारदर्शकपणे जिल्ह्यामध्ये राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना आज दिले. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिका, महापालिका या कार्यालयाने या योजनेच्या माहितीविषयक बोर्ड, बॅनर किंवा होर्डिंग दर्शनी भागात लावावे. अर्ज कसा करावा ते अर्ज कोणाकडे द्यावा; तसेच पात्र व अपात्र विषयीची माहिती स्पष्टपणे नमूद करावी. जिल्ह्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी प्राधान्याने या योजनेची कार्यवाही करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी बोडके यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.