क्रिस्टल डिसुझा, कारण वाही यांची ईडीकडून चौकशी

क्रिस्टल डिसुझा, कारण वाही यांची ईडीकडून चौकशी
Published on

क्रिस्टल डिसुझा, कारण वाही यांची ईडीकडून चौकशी

मुंबई, ता. ३ : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी (ता. ३) क्रिस्टल डिसुजा आणि करण वाही या टीव्ही कलाकारांची ऑक्टा एफएक्स आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी केली. ईडी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या दोघांना संध्याकाळी सोडण्यात आले. मात्र, गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीस बोलावले जाऊ शकते. विदेशी मुद्रा व्यापारातील (फॉरेक्स ट्रेडिंग) गुंतवणुकीतून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात ऑक्टा एफएक्स ॲप व वेबसाईटविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ईडीने तपासावर घेतले. या फसव्या ॲपची जाहिरात, प्रचार आणि प्रसार क्रिस्टल, करण यांनी केला होता. फसवे ॲप आणि वेबसाईट तयार करणाऱ्या कंपनीने सुमारे ५०० कोटींचा घोटाळा केला. ही रक्कम बोगस कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात वळती करून घेण्यात आली, अशी माहिती ईडीला तपासादरम्यान मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.