रुग्णवाहिकेअभावी अन्यायग्रस्ताची तडफड

रुग्णवाहिकेअभावी अन्यायग्रस्ताची तडफड

Published on

रुग्णवाहिकेअभावी अन्यायग्रस्ताची तडफड
आकडी येऊन आंदोलक बेशुद्ध
मुंबादेवी, ता. ४ (बातमीदार) ः
आझाद मैदानात रुग्‍णवाहिका नसल्‍याने एक आंदोलक आकडी (फिट) येऊन बेशुद्ध झाल्‍याची घटना घडली. त्‍यामुळे आंदोलकांनी संताप व्यक्‍त केला.
राज्यभरातून लाखो आंदोलनकर्ते अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आले आहेत. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवसा उकाडा व सायंकाळी पाऊस असल्याने आंदोलनकर्त्यांची त्रेधातिरपीट उडत आहे. त्‍यातच परिचर संघटनेच्या एका पुरुष आंदोलनकर्त्याला आकडी आली. कुणी चामड्याची चप्पल त्याच्या नाकाला लावली, तर कुणी कांदा आणा म्हणून ओरडू लागले. पोलिस व बघ्यांची गर्दी वाढू लागली. बराच वेळ तो आंदोलक तडफडत होता.
ही सर्व गडबड सुरू असताना सरकारी रुग्णवाहिका मात्र मैदानात दिसत नव्हती. आज आकडी आली, उद्या कुणाला हृदयविकाराचा झटका आला तर सरकारने काय उपाययोजना केल्‍या आहेत, असा सवाल आंदोलनकर्ते करत होते. न्याय मागण्यासाठी येत असतानाच अन्याय होत आहे. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्ते करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.