धारावीतील स्कायवॉक उजळला

धारावीतील स्कायवॉक उजळला

Published on

धारावीतील स्कायवॉक उजळला
सकाळ इम्‍पॅक्‍ट
धारावी, ता. ४ (बातमीदार) : धारावीतून माहीम स्थानकाकडे जाण्यासाठी एमएमआरडीएने स्कायवॉक उभारला आहे. गेल्‍या काही दिवसांपासून स्कायवॉकवरील दिवे बंद असल्याने रात्रीच्यावेळी स्कायवॉकवर अंधार पसरत होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’च्या २८ जूनच्या अंकात प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत स्‍कायवॉकवरील दिवे दुरुस्‍त केले आहेत.
स्‍कायवॉकवरील अंधार दूर झाल्‍याने पादचारी, स्‍थानिक रहिवासी समाधान व्यक्‍त करीत आहेत. हा स्कायवॉक माहीम रेल्वे स्थानकापर्यंत जोडला जावा, यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. माहीम स्थानकातून धारावीतील हजारो प्रवासी प्रवास करतात, मात्र स्कायवॉक अर्धवट असल्याने प्रवाशांना स्कायवॉकचा फायदा होत नव्हता. धारावीतून माहीम स्थानकाकडे जाण्यासाठी स्थानिकांना ६० फुटी संत कबीर मार्ग ओलांडून जावे लागत होते. त्‍यामुळे आठ वर्षांपूर्वी स्कायवॉक उभारण्यात आला होता, पण प्रवाशांना व पादचाऱ्यांना धारावी मुख्य रस्त्यावरून चालत जावे लागत होते. स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या दुकानदारांचा स्कायवॉक जोडणीला विरोध होत होता. त्याला न जुमानता स्कायवॉक स्थानकाला जोडला गेल्याने प्रवासी व पादचारी समाधान व्यक्त करत होते, मात्र स्कायवॉकवरील दिवे बंद असल्याने पादचाऱ्यांना मोबाईल टॉर्चच्या उजेडात जावे लागत होते, असे स्थानिक रहिवासी अमर शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.