अवयवदानातून २१३ जणांना जीवदान

अवयवदानातून २१३ जणांना जीवदान

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महाराष्ट्रासह मुंबईत जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ८१ ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानामुळे २१३ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यात पुणे विभाग अव्वल असून मुंबई आणि नागपूर विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे; तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा महिन्यांत केवळ एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाला परवानगी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार जुलै अवयव दान महिना म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने लोकांना अवयवदानासाठी जागरूक करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत असून रुग्णाचे कुटुंबीय स्वतः अवयवदानासाठी पुढे येत आहेत. त्यामुळेच २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत जानेवारी ते जूनदरम्यान अधिक अवयवदान झाल्याचे रिजनल कम स्टेट ऑर्गन ॲण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने (रोटो सोट्टो) म्हटले आहे.
..................................
अवयदानाची आकडेवारी
१ जानेवारी ते १ जुलै या कालावधीत अवयवदानासाठी १४४ मेंदूमृत रुग्णांची नोंदणी झाली. यापैकी केवळ ८१ मेंदूमृत रुग्ण यशस्वीरीत्या अवयवदान करू शकले. या रुग्णांकडून १२४ किडनीदान झाले. याशिवाय ६७ यकृत, ११ फुप्फुसे, १० हृदय आणि एक स्वादुपिंड दान केले.
....................................
६३ हजारांनी प्रतिज्ञा घेतली
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आयुष्मान भव मोहिमे’अंतर्गत २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत ६३ हजारांहून अधिक लोकांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला होता. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून १८ हजार ३९३ जणांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.
.....................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.