अनुकंपा भरतीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

अनुकंपा भरतीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

Published on

अनुकंपा भरतीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

पालघर, ता. ४ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर सेवेत समावून घेण्यासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी शनिवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद कार्यालयामध्ये कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी केले आहे.

शासकीय सेवेत कार्यरत असताना अधिकारी कर्मचारी दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबीयातील पात्र उमेदवारास अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात येते. त्यासाठी ज्या उमेदवारांनी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरच्चंद्र माळी हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे अर्ज केलेल्या सर्व अनुकंपाधारकांनी सादर करायचा प्रस्ताव व त्यासोबत आवश्यक कागदपत्रांसह शनिवारी सकाळी ११ वाजता जननायक बिरसा मुंडा सभागृहात हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.