गर्दीची ठिकाणे फेरीवाला मुक्त

गर्दीची ठिकाणे फेरीवाला मुक्त

Published on

मुंबई, ता. ४ ः शहर आणि उपनगरातील मुख्य रेल्वे स्थानकांचा परिसर फेरीवालामुक्त करण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. गर्दीच्या ठिकाणच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केल्यामुळे या परिसरांनी मोकळा श्वास घेतला आहे; तर पावसाळ्यात रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या विक्रीस पालिकेने प्रतिबंध केला आहे.
गेल्या काही दिवसांत पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या कारवाईमुळे रेल्वे स्थानकांचा परिसर मोकळा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सीएसटी सब-वे, चर्चगट रेल्वे स्थानकाचा परिसर, चर्चगेट सब-वे, दादर, कुर्ला, घाटकोपर, मालाड परिसर, घाटकोपर, उच्च न्यायालय, दहिसर, कुलाबा, आदी परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला आहे. रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणांवर उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार पालिकेने कारवाईचा धडाका लावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.