पावणे सहा लाखांचे ‘एमडी’ जप्त

पावणे सहा लाखांचे ‘एमडी’ जप्त
Published on

पावणेसहा लाखांचे ‘एमडी’ जप्त

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : महापे शिळफाटा भागात एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एकाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचत अटक केली. अशपाक अस्लम मुकादम (वय ४८) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ५८.५० ग्रॅम वजनाचा पावणेसहा लाख रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे.


महापे शिळफाटा भागात एक व्यक्ती एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी महापे शिळफाटा भागात सापळा रचला होता. या वेळी आरोपी अशपाक मुकादम हा संशयास्पदरीत्या आढळला असता पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता, त्याच्याजवळ ५८.५० ग्रॅम वजनाचा पावणेसहा लाख रुपये किमतीचा सफेद रंगाचा एमडी (मेफेड्रॉन) आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करत आरोपीविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी अशपाकला अमली पदार्थ पुरविणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.