मेट्रोचे थकीत कर्ज एक रक्कमी भरा

मेट्रोचे थकीत कर्ज एक रक्कमी भरा

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : घाटकोपर-वर्सोवा मुंबई मेट्रो-१च्या अधिग्रहणाचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. त्याऐवजी मुंबई मेट्रो-१कडे विविध वित्तीय संस्थांचे असलेले थकीत कर्ज एक रकमी भरण्याबाबत एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीने विचार करावा, असे निर्देश दिले आहेत.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि एमएमआरडीएने घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्ग उभारला आहे. त्याची ७४ टक्के मालकी रिलायन्सकडे, तर २६ टक्के मालकी एमएमआरडीएकडे आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई मेट्रो-१ गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणीत आली आहे. जवळपास पाच वित्तीय संस्थांचे १७०० कोटी रुपये थकीत असल्याने दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने सुमारे १७१ कोटी रुपये भरून अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये अधिग्रहणाचा निर्णय रद्द करतानाच एमएमआरीडीएच्या कार्यकारी समितीमध्ये मेट्रो-१ च्या थकीत कर्जाबाबत वन टाईम सेटलमेंटबाबत विचार करावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मेट्रोचे होणारे अधिग्रहण एमएमआरडीएने रद्द केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.