हृदयाचा आकार वाढलेल्‍या तरुणाला जीवदान

हृदयाचा आकार वाढलेल्‍या तरुणाला जीवदान

Published on

हृदयाचा आकार वाढलेल्‍या तरुणाला जीवदान
दुर्मिळ आजारावर मुलुंडमध्ये उपचार
मुलुंड, ता. ६ (बातमीदार) ः कल्प जैन या २१ वर्षीय तरुणाला श्‍वास घेण्‍यास त्रास, थकवा जाणवू लागला होता. त्याच्या कुटुंबीयांनी फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील डॉक्‍टरांची भेट घेतली असता हृदयाचा आकार वाढल्‍याचे निदान झाले. यशस्‍वी उपचार करून या तरुणाला जीवदान देण्यात आले.
वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर कल्पचे पल्‍मनरी व्‍हॉल्‍व्‍ह लीकेज, हार्ट रेट कमी होण्‍यासह हृदयाचा आकार वाढल्‍याचे निदान झाले. पेडिॲट्रिक कार्डियोलॉजीच्‍या संचालक डॉ. स्‍नेहल कुलकर्णी आणि त्‍यांच्‍या टीमच्‍या देखरेखीअंतर्गत त्‍याच्‍यावर ट्रान्‍सकॅथेटर पल्‍मनरी व्‍हॉल्‍व्‍ह रिप्‍लेसमेंट (टीपीव्‍हीआर) करण्‍यात आले. ही किमान शस्‍त्रक्रिया छातीचा भाग न उघडता ट्रान्‍सकॅथेटर तंत्राचा वापर करून करण्‍यात आली.
कल्‍पसाठी ही पहिली हार्ट सर्जरी नव्‍हती. त्‍याचा जन्‍म टेट्रालॉजी ऑफ फॅलॉट या जन्‍मजात हृदयविकारासह झाला होता, ज्‍यावर उपाय म्‍हणून तो एक वर्षाचा असताना त्याच्यावर ओपन हार्ट सर्जरीद्वारे उपचार करण्‍यात आले होते. डॉक्‍टरांनी शिफारस केलेल्‍या सर्व उपाययोजनांचे तो काटेकोरपणे पालन करत होता. क्रिकेट, फुटबॉल व स्‍केटिंगसारख्‍या विविध खेळांमधील त्याचा सहभागदेखील उल्लेखनीय होता. त्‍याने मुंबईमधून त्‍याचे शालेय व पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तो सध्‍या बीकेसीमध्ये एका कंपनीत नोकरीला आहे.
डॉ. स्‍नेहल कुलकर्णी म्‍हणाल्‍या, ट्रान्‍सकॅथेटर तंत्राच्‍या माध्‍यमातून छातीचा भाग न उघडता ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात येते. हृदयविषयक समस्‍यांबाबत काळजी घेण्‍यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. त्‍यानंतर हृदयाच्‍या स्थितीनुसार आणि गरज असल्‍यास शस्‍त्रक्रियेचा पुढील टप्‍पा किंवा आवश्‍यक कृतीबाबत रुग्णाला सल्‍ला दिला जातो, असे त्‍यांनी सांगितले.
रुग्‍णाला नुकताच डिस्‍चार्ज देण्‍यात आला असून त्‍याने पुढील सहा महिन्‍यांसाठी औषधोपचार सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. कल्प जैन आठवडाभरात त्‍याचा दैनंदिन नित्‍यक्रम सुरू करू शकेल. रुग्‍णाचे वडील निखिलकुमार जैन यांनी डॉक्‍टरांचे आभार मानले.

ग्रॉन अप कॉन्‍जेनिटल हार्ट (जीयूसीएच) दोष असलेल्‍या रुग्‍णांना संपूर्ण आयुष्यभर विशेष काळजी घेण्याची गरज असते. अशा रुग्‍णांना व त्‍यांच्‍या कुटुंबीयांना पेडिॲट्रिक हार्ट केअरपासून अडल्‍ट हार्ट केअरपर्यंत वैद्यकीय सहाय्य करण्यात येते.
- डॉ. विशाल बेरी,
फॅसिलिटी डायरेक्‍टर,
फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.