लांब पल्ल्याचा सुखकर प्रवास

लांब पल्ल्याचा सुखकर प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भारतीय रेल्वेने दोन वर्षांमध्ये दहा हजार सामान्य रेल्वे डब्यांची निर्मिती करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. यामुळे लांबपल्ल्याच्या प्रवासात सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
भारतीय रेल्वेत दररोज दोन कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना किफायतशीर, वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने पुढील दोन वर्षांत दहा हजार विनावातानुकूलित डब्यांच्या निर्मितीची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये, प्रत्येकी ५,३०० पेक्षा जास्त सामान्य डब्यांसह सुमारे दहा हजार कोच तयार करण्यात येणार आहेत.
-------------------------------
आर्थिक वर्ष २०२४-२५
- रेल्वेने अमृत भारत सामान्य कोचसह दोन हजार ६०५ सामान्य श्रेणींचे डबे, अमृत भारत शयनयान कोचसह एक हजार ४७० विनावातानुकूलित शयनयान, अमृत भारत एसएलआर डब्यांसह ३२३ एसएलआर कोच, ३२ उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि ५५ आसनी डबे तयार करण्याची योजना आहे.
-------------------------------
आर्थिक वर्ष २०२५-२६
- अमृत भारत सामान्य डब्यांसह दोन हजार ७१० सामान्य कोच, अमृत भारत शयनयान कोचसह एक हजार ९१० विनावातानुकूलित शयनयान, अमृत भारत एसएलआर डब्यांसह ५१४ एसएलआर कोच, २०० उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि २०० पॅन्री व्हॅन आणि कार तयार करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com