पालिकेच्या अनास्थेचा फटका

पालिकेच्या अनास्थेचा फटका

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मुंबई पालिकेच्या शाळा सुरू होऊन जवळपास महिना होत आला तरी विद्यार्थ्यांना गणवेशासह २७ शालेय वस्तूंची अद्याप प्रतीक्षाच आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय वस्तू उशिराने देण्याची प्रथा पालिकेच्या शिक्षण विभागाने कायम ठेवली आहे.
पालिकेच्या सुमारे १.१९५ शाळा आहेत. या शाळेतील मुलांना पालिका गणवेशासह २७ शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. त्यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. पालिका शाळांत शिकणारी बहुतांशी मुले झोपडपट्ट्यांतील मोलमजुरी करणाऱ्या पालकांची असतात. या मुलांना पालिकेकडून आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी २७ शालेय वस्तूंपैकी गणवेश तरी विद्यार्थ्यांना मिळेल, ही अपेक्षा त्यांच्या पालकांची असते. मात्र, अनेक वेळा शैक्षणिक वर्ष संपत आले तरी मुलांना शालेय वस्तू मिळत नाहीत. पालिका प्रशासनाने यंदाही २७ शालेय वस्तूंची वर्क ऑर्डर उशिराने दिल्याने मुलांना पहिल्याच दिवशी गणवेशाविना शाळेत हजर राहावे लागले. अजूनही ८० टक्के शाळांत २७ शालेय वस्तूंची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे २७ शालेय वस्तू उशिराने मिळण्याची प्रथा यंदाही कायम राहिली आहे.
---------------------------------------------
ऑगस्टअखेर वाटपाची शक्यता
- पालिकेच्यावतीने २०२४ ते २०२५ या शैक्षणिक वर्षांसाठी शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी जूनच्या सुरुवातीला कार्यादेश दिले आहेत. त्यामुळे दोन महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास आता मुलांना ऑगस्टअखेर वस्तू मिळण्याची शक्यता आहे.
- २००७ पासून मुंबई पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात येते. मात्र, एक ते दोन वर्षे वगळता प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी या वस्तूंचे वाटप होत आहे.
---------------------------------
विद्यार्थ्यांची संख्या -
- पूर्व प्राथमिक ते इयत्ता २ री : २,५१,५१६
- ३ री ते ७ वी : ३,८२,३८६
- ८ वी १० वी : १,६६,६३८
..................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.