कोट्यवधींचा गंडा घालणारा अटकेत

कोट्यवधींचा गंडा घालणारा अटकेत

Published on

मुंबई, ता. ६ ः गुंतवणूकदारांना १८ कोटींचा गंडा घालून वर्षभरापासून फरारी आरोपीला शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. व्यंकटरमनन गोपालन असे या भामट्याचे नाव आहे.
मेसर्स जी. व्ही. आर. एक्सपोर्टस ॲंड इम्पोर्ट्स ही कंपनी शेतमाल आयात, निर्यात करते. या कंपनीचा विस्तार करायचा असून गुंतवणूक केल्यास महिन्याला ७ ते १० टक्के व्याजासह परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत गोपालन याने दीडशे गुंतवणूकदारांकडून १८ कोटी जमा केले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत पैसे मिळाले नसल्याने गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावताच गोपालन फरारी झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.